#SAvPAK 1st ODI : पाकचा दक्षिण आफ्रिकेवर विजय

बाबरने कोहलीचा विक्रम मोडला

सेंच्युरियन – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने 3 गडी राखून पराभव केला. अखेरच्या चेंडूवर एका धावेची गरज असताना फहीम अशरफने धाव घेत पाकिस्तानच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केले. 

पाकिस्तानच्या बाबर आझमने या सामन्यात एकदिवसीय कारकिर्दीतील 13 वे शतक फटकावले. सर्वात जलद 13 शतके फटकावण्याच्या याच कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले.

बाबरने 76 व्या डावात ही कामगिरी केली असून दक्षिण आफ्रिकेच्या हशिम अमलाने 83 डावांमध्ये तर, कोहलीने 86 डावांत ही कामगिरी केली आहे. एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 273 धावा केल्या. रसी व्हॅन डर डुसानने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक साकार केले. तो 123 धावांवर नाबाद राहिला. डेव्हिड मिलरने अर्धशतक फटकावले.
या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या इमाम-उल-हकने 70 धावांची खेळी केली. तर, कर्णधार बाबरने 103 धावा केल्या. शादाब खानने 33 धावांची बहुमोल खेळी करत पाकिस्तानला 3 गडी राखून विजय मिळवून दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.