मावळातही सावित्रीच्या लेकीच अव्व्ल

बारावीचा निकाल : तालुक्‍यातील 87.47 टक्‍के विद्यार्थी उत्तीर्ण; आठ शाळांची “सेंच्युरी’
उत्तीर्ण मुले 78.91 टक्‍के ; उत्तीर्ण मुली 91.95 टक्‍के
“इंद्रायणी’ @ 86.87

सोमाटणे  – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी बोर्ड परीक्षा मार्च 2019 चा मावळ तालुक्‍याचा निकाल 87.47 टक्‍के एवढा लागला आहे. मावळ तालुक्‍यातून विविध शाखांना तीन हजार 714 विद्यार्थी बसले होते; त्यापैकी तीन हजार 249 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 465 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
आजच्या ऑनलाईन निकालामध्ये उच्चश्रेणीमध्ये 227 विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये एक हजार 119 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीमध्ये एक हजार 750 विद्यार्थी, तर पास श्रेणीमध्ये 153 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मावळ तालुक्‍यात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे. मुलांचा निकाल 78.91, तर मुलींचा निकाल 91.95 टक्‍के एवढा लागला आहे.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील राज्य मंडळाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करून विद्यार्थी व पालकांना सुखद धक्‍का दिला. या वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या मोबाईलवरूनच निकाल पहिल्याने सायबर कॉफे तसेच कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केली नव्हती. या वर्षीच्या निकालात द्वितीय श्रेणी व त्या पास श्रेणीमध्ये अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे निकालावरून दिसत आहे. निकाल पाहून अनेकांनी जल्लोष केला.

देहूच्या संत तुकाराम विद्यालयाची “शंभरी’
देहुरोड – देहूगाव येथील संत तुकाराम विद्यालय आणि कै. शंकरराव मोरे ज्युनिअर कॉलेजचा कला व वाणिज्य विभागाचा निकाल शंभर टक्‍के लागला आहे. विद्यालयाचा निकाल शंभर टक्‍के लागल्याने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, विद्यालयाचे प्राचार्य ईश्‍वर जगताप यांचे सर्व सहकारी शिक्षकांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले. हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे यांनीही शुभेच्छा दिल्या. वाणिज्य शाखेचे 58 व कला शाखेचे 55 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ते सर्वच्या सर्व पास झाल्याने विद्यालयाचा निकाल 100 टक्‍के लागला आहे. वाणिज्य शाखेत सोनाली शिवाजी नेमाने हिने 82.46 टक्‍के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. सहारा अमजद मुलाणी 81.38, प्रतीक्षा प्रकाश गोनबेर 79.07 टक्‍के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. कला शाखेत प्रथमेश उत्तम पुरी याने 70.30 टक्‍के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. मोहिनी रमेश यादव 68.46 टक्‍के आणि लक्ष्मीबाई बाळू गबाले 67.07 टक्‍के गुण मिळवून यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. विद्यालयाच्या वतीने प्राचार्य ईश्‍वर जगताप व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मूकबधिर कौस्तुभ दाबकचे यश
तळेगाव दाभाडे : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तपोधाम कॉलनी येथील मूकबधिर कौस्तुभ अनंत दाबक याने बारावी कला शाखेत 69.53 टक्‍के गुण प्राप्त केले. त्याच्या या यशाबद्दल तळेगाव दाभाडे परिसरातून कौतुक होत आहे. तपोधाम कॉलनी (तळेगाव दाभाडे) येथील कौस्तुभ दाबक हा जन्मताच मूकबधिर आहे. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. दररोज लोकल व बसने तो सी. आर. रंगनाथन ज्यु कॉलेज फॉर डेफ आर्टस्‌ टिंगरेनगर पुणे येथे अभ्यासासाठी जात होता. आई शुभांगी दाबक व वडील अनंत दाबक यांनी अथक प्रयत्न करुन त्याला शिकवण्यासाठी पुढाकार घेतला. कौस्तुभ याने विविध कलाविष्कारात अनेक प्रमाणपत्र, मेडल व सन्मान चिन्ह प्राप्त केले आहे.

शिवाजी विद्यालयाने “नव्वदी’ ओलांडली
देहुरोड : श्री शिवाजी विद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा 90.35 टक्के निकाल लागला आहे. 114 विद्यार्थ्यां पैकी 103 विद्यार्थी पास झाले आहेत. तर व्यवसाय विभागाचा निकाल 100 टक्‍के लागला आहे. विद्यालयाचे प्राचार्य अशोक काटे व उपप्राचार्य बाळू शेंडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. वाणिज्य शाखेत नंदिनी सुरेश ओव्हाळ 82.77 टक्‍के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. पूजा संजय काळे 80 टक्‍के व प्रियांका महादेव गुंड 74.62 टक्‍के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. व्यवसाय विभागात ज्योती तुकाराम पवार 86.62 टक्‍के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. ऋतुजा आनंद धनवडे 80 टक्‍के व चैताली तुकाराम कड 79.38 टक्‍के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.

नेहरू विद्यालयाचा निकाल 86 टक्‍के
कामशेत : येथील पंडित नेहरू विद्यालयाचा 86 टक्‍के निकाल लागला. फेब्रुवारी मध्ये झालेल्या बारावीच्या 307 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 266 विद्यार्थी उतीर्ण झाले असून, 41 विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतून 69 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील 50 विद्यार्थी यशस्वी झाले. कला शाखेतून निलेश लक्ष्मण बांगर (64.31) प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक हृतिक खंडू वाघमारे (62.77), तृतीय क्रमांक भावना पंकज परमार (61.24). वाणिज्य शाखा : 163 विद्यार्थी परीक्षा दिली. त्यातील 160 विद्यार्थी यशस्वी झाले. वाणिज्य शाखा : प्रथम क्रमांक हृतुजा अंकुश खिरीड (84.77), द्वितीय क्रमांक दर्शना दत्तात्रय चोपडे (84.00), तृतीय क्रमांक आरती राजेंद्र लालगुडे (82.81). टेक्‍निकल शाखा : 56 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

न्यू इंग्लिश स्कूलचा 80.61 टक्‍के निकाल
वडगाव मावळ : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल ज्यु. कॉलेजच्या बारावी परीक्षेचा निकाल 80.61 टक्के लागला. निकाल पुढीलप्रमाणे : कला शाखा (78.33) : अभिलाषा नवघणे 70.30 टक्‍के, भारती चव्हाण 67.84 टक्‍के, हनुमंत शिंदे 60 टक्‍के. वाणिज्य शाखा (98.36) : पूजा मालपोटे 74.92 टक्‍के, मुस्कान शेख 72 टक्‍के, पूजा मालपोटे 71.85 टक्‍के. विज्ञान शाखा (76.67 टक्‍के) : अतुल अडकर 56.92 टक्‍के, रुपाली वाळूंज 53.53 टक्‍के, रोहन नखाते 52.15 टक्‍के. संयुक्‍त शाखा : (61.40) : ऐश्‍वर्या दंडेल 67.69 टक्‍के, संकेत थरकुडे 58.15 टक्‍के, निवेदिता भालेराव 56.77. प्राचार्य शंकर डुबल, रूपलेखा ढोरे, मनोज ढोरे, गुरुकुल प्रमुख आत्माराम मोरे, पर्यवेक्षक पोपट कांबळे यांनी कौतुक केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.