स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या पहिल्या महिलांच्या शिक्षिका, कवयित्री, समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची आज जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभर साजरी केली जाते. आधुनिकतेकडे जलद गतीने वाटचाल करणाऱ्या भारतीय स्त्रीयांवर सावित्रीबाईचे अनंत उपकार आहेत. त्यांनी उभारलेल्या स्त्री शिक्षणाच्या चळवळीमुळे आज महिला समाजामध्ये ताठ मानेने वावरू शकत आहे.
लहान -मोठ्या सर्वच महिला त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पुढे जात आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त या चिमुकल्या सावित्रीच्या लेकींनी केलेली हि वेशभूषा आणि छायाचित्रे त्याचीच ग्वाही देत आहेत.
पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रीयांना शिक्षण, सत्ता, संपत्तीचे अधिकार नव्हते, धार्मिक बंधनाखाली स्त्रीयांवर अनेक बंधने लादली गेली होती. बालविवाह, सतीप्रथा, हुंडाप्रथा, विधवेचे केशवपन अशा चालीरितींनी लाखो स्त्रीयांचे आयुष्यच करपून गेले होते. शारीरिक व मानसिक गुलामी पिढ्यान्पिढ्या लादली गेली होती. या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी स्रियांच्या उद्धारासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाईंनी सारे आयुष्य खर्ची घातले.
आज सावित्रीमातेच्या पाउलांवर पाऊल ठेवत सर्वच क्षेत्रात महिला आपली कर्तबगारी सिद्ध करत आहेत. त्यांच्याबाबतची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न होता हे नक्की…