सावित्रीच्या लेकींनी मुले दत्तक घ्यावीत : स्वाती शिंदे 

प्राथमिक शिक्षक बॅंकेने सावित्रीच्या शंभर लेकींचा केला गौरव
नगर (प्रतिनिधी) –प्राथमिक शिक्षकांचे पगार आता भरपूर वाढले आहेत. या गलेलठ्ठ पगारातील किमान पाचशे रूपये आपण उपेक्षित मुलांसाठी खर्च केले पाहिजेत. तसेच पुरस्कारप्राप्त महिला शिक्षिकांनी तीन मुले शिक्षणासाठी दत्तक घेतली पाहिजेत तरच आपण सावित्रीच्या लेकी आहोत ही उपाधी सार्थ ठरेल, अशी भूमिका कवियत्री व लेखिका डॉ. स्वाती शिंदे यांनी केले.

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या शताब्दी वर्षानिमित्त बॅंकेतर्फे शंभर कर्तबगार सभासद महिला शिक्षिकांचा सावित्रीची लेक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी नंदनवन लॉन येथे आयोजित समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांभोरे होते.

प्रास्ताविक बॅंकेचे अध्यक्ष साहेबराव अनाप यांनी तर स्वागत बॅंकेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मुखेकर यांनी केले. गुरुमाऊली मंडळ तथा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापू तांबे यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली. कार्यक्रमास शिक्षण तज्ज्ञ, अभिनेत्री जिजाऊ फेम डॉ. स्मिता देशमुख, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, उपशिक्षणाधिकारी अरूण धामणे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, राज्य वखार महामंडळाचे माजी विभागीय अध्यक्ष विजयकुमार ठुबे, राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब कुल, विभागीय अध्यक्ष अंबादास वाजे, आबासाहेब जगताप, रावसाहेब सुंबे, कैलास चिंधे, दत्ता कुलट, अरूण आवारी, संचालिका विद्युलता आढाव, अर्जुन शिरसाठ, उध्दव दुसुंगे, अविनाश निंभोरे, किसन खेमनर, रामेश्वर चोपडे, नारायण पिसे, बाळासाहेब सालके, विठ्ठल फुंदे, महेश भणभणे, आदींसह जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमती देशमुख म्हणाल्या, शिक्षक केवळ मुल घडवत नाही तर समाज व राष्ट्र घडवत असतात. विणा दिघे यांनी सूत्रसंचालन केले. शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष सलीमखान पठाण यांनी आभार मानले.

दिमाखदार सोहळ्यात अधिकाऱ्यांनी भागविली भाषणाची हौस
जिल्हा शिक्षक संघ तथा गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापू तांबे व त्यांच्या क्रियाशील टीमने अत्यंत नेटके व दिमाखदार नियोजन केले होते. राज्य पुरस्कार वितरण कार्यक्रमाला लाजवेल इतका देखणा व सुंदर असा हा कार्यक्रम झाला. मात्र शिक्षण विभागातील भाषणाची हौस असणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी शिक्षक संघटनेच्या मर्जीतील पुढाऱ्यांना हाताशी धरून आपल्या भाषणाची पुरेपूर हौस भागवून घेतली. त्यामुळे सर्वसामान्य शिक्षक कंटाळलेला असतानाही खुशमस्करे गुरुजींचे पुढारी या अधिकाऱ्यांची बाजू लावून धरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते.

नगरचे साहित्य संमेलन व पहिली कविता
नगरला 1996-97 ला साहित्य संमेलन झाले होते.त्यावेळी मी पदवीच्या प्रथम वर्षात शिकत होते. माझ्या आयुष्यातील पहिली कविता मी या नगरच्या साहित्य संमलेनात सादर केली. त्यामुळे नगरशी जुळलेले नाते व आठवण कधीच विसरू शकत नाही, असे कवियत्री शिंदे यांनी आर्वजून सांगितले.

नंदनवन लॉन बनला सेल्फ ी पॉइंट
नगर जिल्ह्यातील शंभर महिला शिक्षिकांना सावित्रीच्या लेकी हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी या भगिनींनी शिरपेचात फे टा घातला होता. हा देखणा रूबाब आपल्या मैत्रिणी व कुटुबांसोबत सेल्फी घेवून टिपण्याचा मोह त्यांना आवरला नाही. त्यामुळे हे नंदनवन लॉन सेल्फी पॉइंट बनले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.