‘सविता भाभी तू इथेच थांब’ पोस्टरचे ‘गूढ’ उलगडले!

पुणे – पुण्यात सध्या ‘सविता भाभी तू इथेच थांब’ या पोस्टरची चांगलीच चर्चा रंगली आहे. सविताभाभी या नावाने पोस्टर झळकल्याने ही व्यक्ती कोण याबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली होती. मात्र, याचे गूढ आता उलगडले आहे. सविता भाभी मराठी चित्रपटातील एका भूमिकेचे नाव असून त्याची जाहिरात करण्याकरिता हे पोस्टर्स लावण्यात आले होते.

अभिनेता धर्मकीर्ती सुमंत, अभिनेत्री पर्ण पेठे आणि अभिनेता आलोक राजवाडे यांच्या आगामी सिनेमाचे ‘अश्लील मित्र मंडळ’ नावाच्या सिनेमाचे पोस्टर आहे. याशिवाय त्यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला असून यामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर स्वत:ला सविता म्हणत आहे. ‘गरजेपेक्षा जास्त माहिती आहे मात्र तुम्ही तिला कधीच पाहिलं नाही. जिला कुणी कधीच पाहिलेलं नाही’, असे सई म्हणत आहे. यामध्ये एका तरुणाचाही आवाज आहे. 6 मार्च 2020 मध्ये या सिनेमाचे ट्रेलर लॉन्च होणार आहे.

 

View this post on Instagram

 

अख्खं शहर वाट बघतंय तुझी! #SoundOn #AUMM #6March #HandiFutnar

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

दरम्यान, अश्लील उद्योग मित्र मंडळ नावाचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता अमेय वाघ मुख्य भूमिकेत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here