बचत, गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन (भाग १)

प्रसिद्ध कार्डिऑलॉजिस्ट निळकंठ करंदीकर यांनी एका सेमिनारमध्ये सहज केलेलं एक विधान आठवतंय, ते म्हणाले होते की, पैसे किंवा संपत्ती ही अशी सहावी संवेदना आहे की, ज्याच्याआधारे आपण इतर पांच संवेदनांचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे उपभोगू शकतो.

मग संपत्तीची नक्की व्याख्या काय ? अगदी दोनच शब्दांत सांगायचे तर ‘पैशाची किंवा मौल्यवान गोष्टींची उदंडता’. एक लक्षात घेतलं पाहिजे, की बचत, गुंतवणूक व संपत्ती या तीनही संज्ञा या एकमेकांशी फारच निगडीत आहेत परंतु तरी त्यांना स्वतःचा असा वेगळा अर्थ देखील आहे. बचत म्हणजे बाजूला टाकलेली शिल्लक, म्हणजेच आपल्या नेहमीच्या खर्चातून विशिष्ट उद्दीष्टासाठी वाचवून ठेवलेली शिल्लक रक्कम. गुंतवणूक ही त्याच्या पुढची पायरी म्हणजे, शिल्लक किंवा साठवलेली बचतीची रक्कम ही नुसती तशीच न ठेवता त्यात कोणतीही जोखीम न घेता वाढ होण्याच्या उद्देशानं कशात तरी गुंतवणं. आणि संपत्ती म्हणजे, अनेक वर्षांनंतर योग्यप्रकारे केलेल्या (छोट्याश्‍या)गुंतवणुकीतून उभी राहिलेली प्रचंड रक्कम ज्यात उत्तम वाढीसाठी थोडी-फार जोखीम ही गृहीत धरलेलीच असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता, या अनुषंगानं आपल्या सर्वांनाच परिचित असलेली एक संज्ञा म्हणजे वेल्थ मॅनेजमेंट (संपत्ती व्यवस्थापन) ; म्हणजे नक्की काय ? आता संपत्ती व्यवस्थापन म्हणजे ज्यांच्याकडं वेल्थ म्हणजे संपत्ती आहे तिचं व्यवस्थापन करणं की पुढच्या पिढीसाठी संपत्ती जमवणं/तयार करणं? नक्कीच, असलेल्या संपत्तीचं योग्यप्रकारे व्यवस्थापन करणं असं याचं उत्तर असू शकतं परंतु जर एखाद्यास आपल्या मुलांसाठी किंवा पुढच्या पिढीसाठी संपत्ती जमवायची असेल तर काय ? प्रश्न आहे की, खरंच अशाप्रकारे संपत्ती बनवता येऊ शकते का ? तर याचं उत्तर आहे, होय. आपल्यासमोर अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्याद्वारे मागील कांही वर्षांत लोकांची संपत्ती बनली आहे. आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे येथे संबोधलेली संपत्ती ही संज्ञा ही योग्य गुंतवणुकीतून तयार झालेली संपत्ती आहे, ना की कोणत्या धनलाभाद्वारे अथवा लॉटरीद्वारे आलेली संपत्ती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)