बारामती – वात्सल्य फाऊंडेशन पुरस्कृत मेहता हॉस्पिटलमध्ये गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे एका महिलेला जीवदान देण्याचे काम स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विशाल मेहता यांनी केले.
वात्सल्या फौंडेशन पुरस्कृत मेहता हॉस्पिटल मध्ये एक स्त्री अतिशय वेदनेने त्रस्त अवस्थेत दाखल झाली. मेहता हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ञ डॉ. विशाल मेहता यांनी त्या स्त्रीच्या सहन न होणाऱ्या वेदना पाहून, त्वरित ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला. या स्त्रीच्या गर्भाशयातील पिशवीमध्ये प्रचंड मोठी म्हणजे तब्बल वीस सेंटीमीटरची गाठ तयार झाली होती. अशा प्रकारची मोठे गाठ काढणे अतिशय गुंतागुंतीचे असते. यामध्ये ऑपरेशन साठी उशीर झाल्यास रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. याचा विचार करून क्षणाचाही विलंब न करता डॉक्टर विशाल मेहता यांनी ऑपरेशनचा निर्णय घेतला. व यशस्वीरित्या गर्भाशयातील गाठ काढून महिलेचा जीव वाचवला.
अशा प्रकारची गाठ स्त्रीच्या गर्भाशयातील मांसपेशीपासून तयार होते. व ती मोठी झाल्यास प्रचंड वेदना, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. व लवकर उपचार घेतले नाही, तर स्त्रीच्या जीवावर बेतू शकते. असे डॉक्टर विशाल मेहता यांनी सांगितले.