नवी दिल्ली – करोना व्हायरसमुळे नागरिकांच्या विशेषत: शहरी भागातील नागरिकांच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे बचतीचा दर कमी झाला असल्याचे लोकल सर्कल या संस्थेने केलेल्या
सर्वेक्षणात आढळून आले आहे.
उत्पन्न कमी झाल्यामुळे दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अनेकांना बचतीतून खर्च करावा लागत आहे किंवा कर्ज काढावे लागत आहे. त्यामुळे या कालावधीत बचत करता आली नसल्याचे बहुतांश नागरिकांनी सांगितले.