जोहान्सबर्ग – भारताविरुद्धच्या तिन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपला 17 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. संघाचे नेतृत्व टेंबा बावुमाकडे सोपवण्यात आले आहे. तसेच कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केलेल्या मार्को जेन्सनला पहिल्यांदाच एकदिवसीय संघात स्थान दिले आहे.
वेन पारनेल, सिसांदा मगाला आणि जुबैर हम्जा यांनीही संघात पुनरागमन केले आहे. ही एकदिवसीय मालिका 19 जानेवारीला होत असलेल्या पहिल्या सामन्याने सुरु होणार आहे. दुसरा सामना 21 जानेवारी आणि तिसरा सामना 23 जानेवारीला होणार आहे.
सलामीवीर व यष्टीरक्षक क्वांटन डिकॉकचा याचाही संघात समावेश असून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरची ही त्याची पहिलीच एकदिवसीय मालिका आहे. सेंच्युरियन कसोटीत भारताकडून पराभव झाल्यानंतर त्याने एक आठवड्यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय संघ – टेंबा बावुमा (कर्णधार), केशव महाराज (उपकर्णधार), क्वांटन डिकॉक, जुबैन हम्जा, मार्को जेन्सन, जनेमन मलान, सिसांदा मागाला, एडन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एन्जीडी, वेने पारनेल, डेव्हीड फुल्कवायो, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, रुसी वॅन दर दुसेन आणि काएल वेर्नन.