केपटाऊन : – जसप्रीत बुमराहसह भारताच्या प्रमुख गोलंदाजांनी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या व निर्णायक कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 210 धावांवर संपवताना 13 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर बुधवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने आपल्या दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 57 धावा केल्या आहेत. खेळ थांबला तेव्हा कर्णधार विराट कोहली 14 धावांवर तर, चेतेश्वर पुजारा 9 धावांवर खेळत आहे. भारताकडे आता एकूण 70 धावांची आघाडी आहे.
– कोहली व पुजाराची संयमी भागीदारी
– दोन दिवसांत 22 बळी
– खेळपट्टीवर आयसीसीकडूनही टीका
– दोन्ही संघांचे प्रत्येकी पहिले डाव दोन दिवसांतच संपले
– भारताची गोलंदाजी भेदक तर क्षेत्ररक्षण ढीसाळ
– पुजाराकडून बवुमाला जीवदान
– यष्टीरक्षक पंतकडून ढीसाळ कामगिरी
मंगळवारच्या 1 बाद 17 धावांवरून पुढे खेळ सुरु झाल्यावर एडन मार्करम व केशव महाराज यांना अनुक्रमे जसप्रीत बुमराह व उमेश यादवने बाद केले व त्यांची 3 बाद 45 अशी स्थिती केली. त्यावेळी किगन पीटरसनने 72 धावांची खेळी करताना रुसी वॅन दर दुसेन 21 व टेंबा बवुमा 28 यांच्या साथीत संघाचा डाव सावरला. तो बाद झाल्यावर कागिसो रबाडाने 15 तर, ड्वेन ऑलिव्हरने नाबाद 10 धावा करत संघाला द्विशतकी मजल मारुन दिली. त्यांचा डाव संला तेव्हा भारताला पहिल्या डावात 13 धावांची निसटती आघाडी मिळाली. भारताकडून बुमराहने 5 गडी बाद केले. त्याला साथ देताना इमेश यादव व महंमद शमी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शार्दुल ठाकूरने 1 गडी बाद केला.
भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही निराशाजनक झाली. सलामीवीर मयंक आग्रवाल लवकर परतला. त्यानंतर लगेचच लोकेश राहुलही बाद झाला. यावेळी संघाच्या 2 बाद 24 धावा झाल्या होत्या. यावेळी कर्णधार विराट कोहली व चेत्श्वर पुजारा या जोडीने दिवसातील उर्वरीत षटके खेळून काढताना आणखी नुकसान होऊ दिले नाही. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा व मार्को जेन्सन यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव – 223 धावा. दक्षिण आफ्रिका पहिला डाव – 76.3 षटकांत सर्वबाद 210 धावा. (किगन पीटरसन 72, टेंबा बवुमा 28, केशव महाराज 25, रुसी वॅन दर दुसेन 21, कागिसो रबाडा 15, ड्वेन ऑलिव्हर नाबाद 10, जसप्रीत बुमराह 5-42, महंमद शमी 2-39, उमेश यादव 2-64, शार्दुल ठाकूर 1-37). भारत दुसरा डाव – 17 षटकांत 2 बाद 57 धावा. (विराट कोहली खेळत आहे 14, चेतेश्वर पुजारा खेळत आहे 9, मार्को जेन्सन 1-7, कागिसो रबाडाव 1-25).