केपटाउन : इंग्लड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेतील दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यात अखेरच्या दिवशी (मंगळवारी) दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३१२ धावांची तर इंग्लंडला विजयासाठी ८ विकेटची आवश्यकता आहे. विजयासाठी ४३८ धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने २ बाद १२६ अशी मजल मारली आहे.
Stumps – day 4 | SA: 126/2
What. A. Day of test cricket!
Solid batting 💪
Malan’s brilliance 🔥
Partnership performances 👌The heat is on for day 5…😳
Your excitement level? _________✍️#ProteaFire #SAvENG pic.twitter.com/nCgdKWPWSN
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 6, 2020
इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद २६९ धावा केल्या होत्या, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला २२३ धावांत गुंडाळत इंग्लंडने ४६ धावांची आघाडी घेतली होती. दुस-या डावात इंग्लंडने डोमिनिक सिबलीच्या नाबाद १३३ आणि बेन स्टोक्सच्या ७२ धावांच्या खेळीच्या जोरावर चौथ्या दिवशी दुसरा डाव ८ बाद ३९१ वर घोषित केला. पहिल्या डावातील ४६ धावांच्या आघाडीसह इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेसमोर ४३८ धावांचे आव्हान ठेवले.
England declare.
South Africa require 438 runs for victory!#SAvENG 👉 https://t.co/uKxPElpzEU pic.twitter.com/OY7FS8pLIw
— ICC (@ICC) January 6, 2020
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवसअखेर ५६ षटकात २ बाद १२६ अशी मजल मारली आहे. डीन एल्गर ३४ आणि जुबैर हमजा १८ धावांवर बाद झाले. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि जो डेनली यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ज्युनियर पीटर मालन ६३ आणि केशव महाराज २ धावांवर खेळत होता.