#SAvENG : इंग्लंडने मालिका जिंकली

ऑकलंड – डेव्हिड मलानची अर्धशतकी खेळी तसेच कर्णधार इयान मॉर्गन व जोस बटलर यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत यजमान दक्षिण आफ्रिकेचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह इंग्लंडने या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडने सलग दुसऱ्या टी-20 सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेवर मात करत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने आफ्रिकेने विजयासाठी दिलेले 147 धावांचे आव्हान 6 गडी गमावून पार करत मालिका खिशात टाकली. मलान सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करताना इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा डाव 20 षटकांत 6 बाद 146 धावांवर रोखला. इंग्लंडकडून आदिल राशिदने 2 तर, जोफ्रा आर्चर, सॅम कुरन व ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

इंग्लंडच्या डावाची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर जेसन रॉय लवकर बाद झाला. त्यानंतर मात्र, मलानने बटलरच्या साथीत संघाचा डाव सावरला. बटलर बाद झाल्यावरही मलानने आपले अर्धशतक पूर्ण करताना कर्णधार मॉर्गनसह संघाचा विजय निश्‍चित केला. मात्र, अर्धशतक पूर्ण झाल्यावर तो देखील बाद झाला. मलानने 40 चेंडूत 7 चौकार व 1 षटकार फटकावताना 55 धावांची खेळी केली. यानंतर मॉर्गनने जबाबदारीने फलंदाजी करत संघाचा मालिका विजय साकार केला. दक्षिण आफ्रिकेकडून तबरेज शम्सीने 3 गडी बाद केले. लुंगी एन्जिडीने 2 तर, कागिसो रबाडाने 1 गडी बाद केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.