लंडन : आगामी दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी इंग्लंडने शनिवारी १७ जणांचा संघ जाहीर केला असून जेम्स अँडरसनचा संघात समावेश केला आहे. जेम्स अँडरसन आॅगस्टमध्ये आॅस्ट्रेलियाविरूध्द झालेल्या सामन्यात पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता, मात्र दुखापतीतून सावरल्यानंतर पुन्हा एकदा त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज मार्क वूड आणि यष्टीरक्षक जाॅनी बेअरस्टो यांचे देखील संघात पुरागमन झाले आहे.
🚨 BREAKING NEWS 🚨
We have named our squad for the four-match Test series in South Africa!
— England Cricket (@englandcricket) December 7, 2019
बेअरस्टोला नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरूध्दच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान दिले नव्हते, पण त्याचा १७ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला होता. वेगवान गोलंदाज मार्क वूड देखील गुडघ्याच्या दुखापतीमुळे अॅशेस मालिकेपासून संघाबाहेर होता. इंग्लंड- न्यूझीलंड दरम्यान चार सामन्याच्या कसोटी मालिकेस २६ डिसेंबर पासून सेंचुरियनमध्ये सुरूवात होणार आहे.
इंग्लंडचा संघ : जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जाॅनी बेअरस्टो( यष्टीरक्षक),स्टुअर्ट ब्राॅड, राॅरी बर्न्स, जोस बटलर, जाक क्राले, सॅम करन, जो डेन्टली, जॅक लीच, मॅथ्यू पार्किन्सन, ओली पोप, डोमोनिक सिबले, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड.