सेंच्युरियन : इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेविरूध्द मालिकेतील पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी आणखी २५५ धावा करण्याची गरज आहे. शनिवारी दक्षिण आफ्रिकेने दुस-या डावात सर्वबाद २७२ धावा करत पहिल्या डावातील १०३ आघाडीसह इंग्लंडसमोर विजयासाठी ३७६ धावांचे आव्हान ठेवले.
No fifty for Vernon Philander!
South Africa set England 376 to win the first Test.#SAvENG pic.twitter.com/QgXIon6U4x
— ICC (@ICC) December 28, 2019
त्यानंतर तिस-या दिवसअखेर इंग्लंडने १ बाद १२१ धावा केल्या असून त्यांना विजयासाठी आणखी २५५ धावांची गरज आहे. इंग्लंडचा फलंदाज डोमिनिक सिबली २९ धावांवर बाद झाला आहे. त्याला केशव महाराजने झेलबाद केले. तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जो डेनली १० आणि राॅरी बर्न्स ७७ धावांवर खेळत होता.
End of day three in Centurion.
England finish the day 121/1, Rory Burns leading the way with 77* 👏 #SAvENG pic.twitter.com/D45USBwF5e
— ICC (@ICC) December 28, 2019
कालच्या ४ बाद ७२ वरून पुढे खेळताना दक्षिण आफ्रिकेने धावसंख्येत २०० धावांची भर घातली. द.आफ्रिकेचा दुसरा डाव २७२ वर संपुष्टात आला. यात रैसी वैन डर डुसेनने सर्वाधिक ५१, फिलँडरने ४६, ऐनरिक नाॅर्टजेने ४०, डी काॅकने ३४ धावा केल्या. इंग्लंडकडून दुस-या डावात गोलंदाजीत जोफ्रा आर्चरने ५, बेन स्टोक्सने २ गडी बाद केले.
End of innings | SA: 272 all out
All good things come to an end.
Philander is the last batter out for 46.
Earlier van der Dussen struck a maiden half-ton to propel the Proteas' batting charge.
The Proteas have set England of 376 runs to win the match.#ProteaFire #SAvENG pic.twitter.com/UDR7dumdlW
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 28, 2019
तत्पूर्वी, द.आफ्रिकेच्या पहिल्या डावातील २८४ धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव १८१ वर आटोपला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावातील धावसंख्येवर १०३ धावांची आघाडी घेतली होती.