केपटाउन : डोमिनिक सिबली आणि जो रूट यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने द.आफ्रिकेविरूध्दच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये दुस-या डावात तिस-या दिवसअखेर ४ बाद २१८ धावा केल्या. यासह पहिल्या डावातील ४६ धावांच्या आघाडीसह आता इंग्लंडने एकूण २६४ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.
Stumps | ENG: 218-4
Day 3 comes to a close with a wicket for Nortje – his second of the day.
Tough day for the bowlers with the pitch offering very little assistance.
England close the day on 218-4 with a lead of 264 runs in their second innings.#ProteaFire #SAvENG pic.twitter.com/UbWY0xlRXF
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 5, 2020
द.आफ्रिकेला कालच्या ८ बाद २१५ वरून पुढे खेळताना तिस-या दिवशी फक्त ८ धावांची भर टाकता आली आणि त्यांचा पहिला डाव २२३ वर आटोपला. यामध्ये एल्गरने ८८, डुस्सानने ६८ धावांची खेळी केली. आफ्रिकेकडून अँडरसनने ४० धावांत ५ तर स्टुअर्ट ब्राॅडने ३८ धावांत २ गडी बाद केले.
त्यानंतर इंग्लंडने दुस-या डावात खेळताना दिवसअखेर ७९ षटकांत ४ बाद २१८ धावांची मजल मारली आहे. डोमिनिक सिबली याने जक क्राॅलसोबत २८, जो डेनलीसोबत ७३, जो रूटसोबत ११६ धावांची भागिदारी रचत संघाची धावसंख्या २०० पार नेली.
यामध्ये क्राॅलने २५, जो डेनलीने ३१, जो रूटने ६१ धावांची खेळी केली. आफ्रिकेकडून एन्रिच नाॅटर्जेने २ तर रबाडा आणि प्रिटोरियसने प्रत्येकी १ गडी बाद केला. डोमनिक बेस शून्यावर बाद झालानंतर पंचानी तिस-या दिवसाचा खेळ थाबंवला तेव्हा सिबली २२२ चेंडूत १३ चौकारांसह ८५ धावांवर खेळत होता.