केपटाउन : दक्षिण आफ्रिका-इंग्लंडदरम्यानच्या मालिकेतील दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यास न्यूलँन्डस येथे आजपासून सुरूवात झाली आहे. द.आफ्रिकेने चार सामन्याच्या या कसोटी मालिकेत पहिला सामना जिंकून १-० ने आघाडी घेतली आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
https://twitter.com/ICC/status/1213008395801911297?s=19
दक्षिण आफ्रिकेने संघात एक बदल केला असून एडेन मार्करमच्या जागी ज्युनियर पीटर मालन यास संघात स्थान दिलं आहे तर इंग्लंडने संघात तीन बदल केले आहेत. राॅरी बर्न्स, जाॅनी बेयर्सटो, जोर्फा आर्चरच्या ऐवजी जक क्राॅल, आॅली पोप आणि डोमनिक बेस यांचा संघात समावेश केला आहे.
इंग्लंडने फलंदाजीस सुरूवात केली असून सलामीवीर जक क्राॅल ४ धावांवर माघारी परतला आहे. त्याला फिलँडरने क्विंटन डी काॅककरवी झेलबाद केलं. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडच्या १९ षटकांत १ बाद ४७ धावा झाल्या असून खेळपट्टीवर डोमिनिक सिबली २८ तर जो डेनली २० धावांवर खेळत आहेत.
इंग्लंड संघ : डोमिनिक सिबली, जक क्रॉल, जो डेनली, जो रूट, बेन स्टोक्स, ऑली पोप, जोस बटलर, सैम करन, डोमनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स एंडरसन
द.आफ्रिका संघ : पीटर मालन ज्यु., डीन एल्गर, जुबैर हमज़ा, फाफ डू प्लेसी, रैसी वैन डर डुसेन, क्विंटन डी कॉक, ड्वेन प्रीटोरियस, वरनॉन फ़िलेंडर, केशव महाराज, कगिसो रबाडा, ऐनरिक नॉर्टजे