ईस्ट लंडन (इंग्लंड) : फलंदाजीनंतर गोलंदाजीत केलेल्या सरस कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा अवघ्या १ धावेने पराभव करत विजय मिळविला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. लुंगी एनगिडी सामनावीर ठरला.
Result | ENG: 176-8
What. A. Match
7 runs successfully defended by the Proteas✅
It went down to the wire, a victory off the final ball of the match.
Ngidi took 2 wickets and only conceded 5 runs
South Africa win by 1 run & take a 1-0 lead in the series.#ProteaFire #SAvENG pic.twitter.com/1NPxfTbOKY
— Cricket South Africa (@OfficialCSA) February 12, 2020
दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या १७८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला २० षटकात ९ बाद १७६ धावांच करता आल्या आणि अतितटीच्या सामन्यात त्यांना १ धावेने पराभव पत्करावा लागला. इंग्लंडकडून फलंदाजीत जेसन राॅयने सर्वाधिक ७०(३८), इयोन माॅर्गनने ५२(३४), जाॅनी बेयर्सटो २३(१९) आणि जोस बटलरने १५(१०) धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत लुंगी एनगिडीने सर्वाधिक ३, एंडिल फेहलुकवायो आणि ब्यूरन हेंड्रिक्सनी प्रत्येकी २ तर डेल स्टेनने १ गडी बाद करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्विकारले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बमुवाच्या ४३(२७), क्विंटन डी काॅकच्या ३१(१५), रैसी वैन डर डुसेनच्या ३१(२६) आणि जेजे स्मट्सच्या २०(२०) धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ८ बाद १७७ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून क्रिस जाॅर्डनने २ तर मोईन अली, टाॅम करन, मार्क वूड, आदिल रशिद आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी १ गडी बाद केला.