‘PM निवासासाठी १३,००० कोटी खर्च करण्यापेक्षा लोकांचे जीव वाचवा”

प्रियांका गांधींनी दिला मोदी सरकारला सल्ला

नवी दिल्ली –  देशात करोनाचा थैमान थांबायच नाव घेत नाही. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहेत. तसेच व्हेंटिलेटर्स देखील कमी पडत आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून तसेच आरोग्य सुविधांच्या अभावी लोकांचा करोनाने मृत्यू होत आहे. मात्र असं असतांना सुद्धा  दिल्लीत पंतप्रधान निवासाचे काम वेगात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

 

काय म्हणाल्या प्रियांका गांधी

देशात लोक ऑक्सिजनचा पुरवठा, लस, ऑक्सिजन बेड्स, औषधे मिळवण्यासाठी झगडत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पंतप्रधान निवास बनवण्यासाठी १३,००० कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा, आपली सर्व ताकद लोकांचे जीव वाचवण्यासाठी वापरायला हवी असं म्हणत गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.