सावरकरांच्या मुद्यावरून काँग्रेस शिवसेनेत वादाची ठिणगी ?

मुंबई: राज्यातील सरकार स्थापनेसाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित आल्यानंतर हे सरकार पाच वर्षे टिकणार नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याने शिवसेना आणि काँग्रेस आमने सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.

राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपनेत्यांकडून टीकेची झोड उठली आहे. त्यात आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत याहुनी उडी घेतली असून त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी पडलायचे पाहायला मिळत आहे. राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून सावरकरांचा सन्मान व्हायलाच हवा, त्याच्याशी कधीही तडजोड होऊ शकत नाही, अशा शब्दांत राहुल यांचे कान टोचले आहेत.

‘वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्याप्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही. आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे’ असे ट्विट करत राऊत यांनी राहुल गांधी यांना खडेबोल सुनावले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.