महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात सावरकरांचे नाव

दिग्विजय सिंह यांची सरकारवर टीका

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने स्वातंत्र्यसैनिक वि.दा.सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी टीका केली आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात सावरकर यांचे नाव समोर आले होते. त्यांच्या जीवनात दोन पैलू होते. ते इंग्रजांना माफी मागून परत आले होते, असे त्यांनी म्हटले आहे.

झाबुआ मतदरासंघातील उमेदवार कांतिलाल भूरिया यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते अलिराजपूर येते आले होते. त्यावेळी माध्यमांशी ते बोलत होते. ते म्हणाले, सावरकर यांच्या जीवनाचे दोन पैलू होते. ते स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात सहभागीही झाले आणि इंग्रजांची माफीही मागून ते परत आले होते. महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटातही त्यांचे नाव आले होते.

यापूर्वी, कॉंग्रेस प्रवक्ते आणि आनंदपूर साहिबचे खासदार मनीष तिवाही यांनी सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या भाजपच्या मागणीवर निशाणा साधला होता. महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसेलाही हा सन्मान देण्याची मागणी का नाही करत? असा सवाल त्यांनी केला. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षी भाजपच्या नेतृत्वाने यावर गंभीरपणे विचार करायला हवा, असेही ते म्हणाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.