राजकोट – वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याने केलेल्या अफलातून कामगिरीच्या व अत्यंत चाणाक्ष नेतृत्वाच्या सौराष्ट्र संघाने देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या गेल्या 73 वर्षांच्या इतिहासात पहिले वहिले विजेतेपद साकार केले. शुक्रवारी संपलेल्या अंतिम सामन्यात अखेरच्या दिवशी बंगालवर पहिल्या डावातील 44 धावांच्या आघाडीच्या जोरावर सौराष्ट्राने विजेतेपद मिळविले.
Saurashtra are the @paytm #RanjiTrophy 2019-20 Champions! ??
Bengal put up a solid fight in the #Final and had a fine season. ?? #SAUvBEN
Scorecard ? https://t.co/LPb46JOjje pic.twitter.com/NH0SZbLStM
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 13, 2020
या स्पर्धेच्या इतिहासात गेल्या 8 वर्षांत 4 वेळा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. यावेळी मात्र त्यांनी फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व नेतृत्व या सर्व प्रकारात बंगालवर वर्चस्व राखले. कर्णधार जयदेव उनाडकट याने संघाचे नेतृत्व अत्यंत हुशारीने सांभाळले.
सौराष्ट्रने पहिल्या डावात 425 धावा उभारून बंगालवर दडपण आणले. अर्पित वसवदाची शतकी खेळी व चेतेश्वर पुजारा, अवी बारोट व विश्वराज जाडेजा यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सौराष्ट्रने बंगालच्या गोलंदाजीतील हवाच काढून टाकली. बंगालकडून अकाश दीपने 4, शाहबाज अहमदने 3, मुकेश कुमारने 2 तर इशान पोरेलने 1 बळी घेतला.
बंगालनेही पहिल्या डावात सौराष्ट्रला चांगली लढत दिली. मात्र, त्यांना पहिल्या डावात आघाडी घेण्यात अपयश आले. त्यांचा पहिला डाव 381 धावांवर संपला. सौराष्ट्रला पहिल्या डावात 44 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली व तिथेच त्यांचा विजय निश्चित झाला. सामना जरी अनिर्णित असाच नोंदला गेला असला तरीही पहिल्या डावातील आघाडीमुळे सौराष्ट्रला विजेतेपदाचा मान मिळाला.
सौराष्ट्रने दिवसातील काही षटके केळून काढताना आपल्या दुसऱ्या डावात 4 गडी गमावून 105 धावा केल्या होत्या, त्यावेळी या सामन्यात निर्णायक विजय मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने सामना थांबविण्यात आला. पहिल्या डावातील शतकवीर अर्पित वसवदा सामनावीर ठरला.
संक्षिप्त धावफलक-
सौराष्ट्र पहिला डाव – 171.5 षटकांत सर्वबाद 425. बंगाल पहिला डाव – 161 षटकांत सर्वबाद 381. (सुदीप कुमार 26, मनोज तिवारी 35, सुदीप चटर्जी 81, वृद्धिमान साहा 64, अनुस्तूप मुजूमदार 63, अर्णब नंदी नाबाद 40, धर्मेंद्रसिंह जडेजा 3-114, प्रेरक मांकड 2-45, जयदेव उनाडकट 2-96). सौराष्ट्र दुसरा डाव – 34 षटकांत 4 बाद 105. (अवि बारोट 39, हार्विक देसाई 21, शाहबाज अहमद 2-32).