सौरभ, मिथुन उपान्त्य फेरीत दाखल 

ऋतुपर्णा, शुभंकर, वृषाली यांचे आव्हान संपुष्टात

रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा
व्लाडिव्होस्टॉक – भारताचा अव्वल पुरुष खेळाडू सौरभ वर्मा आणि बिगरमानांकित मिथुन मंजुनाथ यांनी पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारताना येथे सुरू झालेल्या रशिया ओपन टूर सुपर-100 बॅडमिंटन स्पर्धेचा आजचा दिवस गाजविला. परंतु राष्ट्रीय विजेती ऋतुपर्णा दास हिच्यासह वृषाली गुम्माडी आणि पाचवा मानांकित शुभंकर डे यांचे आव्हान उपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आठव्या मानांकित सौरभ वर्माने इस्रायलच्या तृतीय मानांकित मिशा झिबरमनचा कडवा प्रतिकार 21-14, 21-16 असा 37 मिनिटांच्या झुंजीनंतर मोडून काडला. उपान्त्य फेरीत सौरभ वर्मासमोर भारताच्या मिथुन मंजुनाथचे आव्हान आहे. सौरभने त्याआधी दुसऱ्या फेरीत भारताच्या राहुल यादवला आणि उपउपान्त्यपूर्व फेरीत रशियाच्या सर्गेई सिरॅंटला पराभूत केले होते. तर मिथुनने मिथुन मंजुनाथने जपानच्या कोजी नाइटोचा पराभव केला होता.

उपान्त्यपूर्व फेरीतील आणखी एका लढतीत मिथुन मंजुनाथने मलेशियाच्या सतीशथरन रामचंद्रनची झुंज 21-18, 21-12 अशी संपुष्टात आणताना अखेरच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. पुरुष एकेरीतील दुसऱ्या उपान्त्य लढतीत जपानचा कोकी वातानबे आणि रशियाचा द्वितीय मानांकित व्लादिमीर माल्कोव्ह यांच्यात झुंज रंगेल. वातानबेने जपानच्या रयोतारो मारुओचा 21-15, 21-10 असा पराभव केला. तर माल्कोव्हने भारताच्या पाचव्या मानांकित शुभंकर डे याचे आव्हान 22-20, 21-15 असे मोडून काढत उपान्त्य फेरी गाठली.

महिला एकेरीत याआधी रशियाच्या व्हिक्‍टोरिया स्लोबोदिन्युकपाठोपाठ मलेशियाच्या द्वितीय मानांकित यिंग यिंग लीवर सनसनाटी मात करणाऱ्या भारताच्या ऋतुपर्णा दासला मलेशियाच्या इरिस वॅंगविरुद्ध 17-21, 13-21 असा 31 मिनिटांत पराभव पत्करावा लागला. तसेच कोरियाच्या लिम ली हिला चकित करणाऱ्या वृषाली गुम्माडीला मलेशियाच्या येन मेई हो हिच्याकडून 9-21, 11-21 असा सरळ पराभव पत्करावा लागला.

तत्पूर्वी सिद्धार्थ प्रताप सिंग आणि सातवी मानांकित मुग्धा आग्रे या भारतीयांचे आव्हान उपान्त्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. तसेच चिराग सेन, पारुपल्ली कश्‍यप, प्रतुल जोशी, अजय जयराम, गुरुसाई दत्त, पारुपल्ली कश्‍यप, प्रतुल जोशी, चिराग सेन, राहुल यादव, बोधित जोशी, वैदेही चौधरी व साई उत्तेजिता राव या भारतीय खेळाडूंना दुसऱ्याच फेरीत पराभव पत्करावा लागला आहे.

———————————————————————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)