सौरभ वर्मा रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत

व्लाडिव्होस्टॉक: भारताच्या सौरभ वर्माने रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत सौरभने आपला प्रतिस्पर्धी मिथून मंजुनाथवर मात केली. दुखापतींमधून सावरत या स्पर्धेद्वारे पुनरागमन करणाऱ्या सौरभने मिथूनला 21-9, 21-15 अशा दोन सरळ सेट्‌समध्ये पराभूत केलं. अंतिम फेरीत सौरभची गाठ जपानच्या कोकी वाटांबेशी पडणार आहे.

सौरभ वर्मा व्यतिरीक्त भारताच्या मिश्र दुहेरी जोडीनेही अंतिम फेरी गाठली आहे. कुहू गर्ग आणि रोहन कपूर या जोडीने आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखत मलेशियन प्रतिस्पर्ध्यांची झुंज मोडून काढली. भारतीय जोडीने उपांत्य फेरीचा हा सामना 21-19, 11-21, 22-20 असा जिंकला. अंतिम फेरीत भारतीय जोडीसमोर रशिया-कोरियाच्या जोडीचं आव्हान असणार आहे. दुसरीकडे भारताच्या पुरुष दुहेरी जोडीला मात्र उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. अरुण जॉर्ज आणि श्‍याम शुक्‍ला जोडीला स्थानिक रशियन जोडीने 15-21, 19-21 अशा दोन सेट्‌समध्ये हरवलं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चीन तैपेई मास्टर्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या सौरभने आजच्या सामन्यातही आपला वरचष्मा कायम राखला. दोन्ही सेट्‌समध्ये सौरभकडे 6 गुणांची भक्कम आघाडी होती. दुसऱ्या सेटमध्ये मिथूनने पुनरागमन करत सौरभला धक्का दिला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत सौरभने सामन्यात बाजी मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)