पुणे – महाराष्ट्र राज्य ऍथलेटिक्स संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या कुमार गटाच्या राज्य अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत पहिल्या दिवशी 20 वर्षांखालील गटात ठाण्याच्या सौरभ नईथाम आणि केईशा मोदी यांनी 100 मीटर धावण्याची शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा मान मिळविला.
भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत सौरभने 10.45 सेकंद, तर केईशाने 12.08 सेकंद अशी वेळ दिली. स्पर्धेतील 18 वर्षांखालील गटात मुलांच्या गटात कोल्हापूरच्या दिग्विजय चौगुले याने 10.95 सेकंद वेळ देत 100 मीटर धावण्याची शर्यत जिंकली.