मुंबई – भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने त्याची नवी इनिंग आजपासून सुरू केली आहे. त्याने आज अधिकृतरित्या भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) चे अध्यक्षपद स्विकारले आहे. बीसीसीआयच्या मुंबईतल्या मुख्यालयात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये दादाची बिनविरोध निवड करण्यात आली.
It’s official – @SGanguly99 formally elected as the President of BCCI pic.twitter.com/Ln1VkCTyIW
— BCCI (@BCCI) October 23, 2019
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केलेल्या प्रशासकीय समितीचा कार्यकाळ आज संपला. त्यामुळे आजच सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्याच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभाही आजच पार पडणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह बीसीसीआयच्या सचिवपदी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमाळ यांची बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदी निवड झाली.