जागतिक नेमबाजी विश्वचषक 2019 : विश्वविक्रमासहित सौरभ चौधरीने पटकावले सुवर्णपदक

नवी दिल्ली – भारतीय नेमबाज सौरभ चौधरीने जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात विश्वविक्रमासहित सुवर्णपदक पटकावले आहे. या पदकासह भारताने या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत 2 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. शनिवारी अपूर्वी चंदेला हिने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात विश्वविक्रमासहित सुवर्णपदक पटकावले आहे.

स्पर्धेच्या सुरूवातीपासून सौरभ चौधरीने आघाडीवर राहत अचूक वेध साधत 245 गुणांची कमाई करत पहिले स्थान पटकावले. सर्बियाचा दामी मिकेच हा 239.3 गुण मिळवत दुसऱ्या तर चीनच्या के वेई पांग याने 215.2 गुण मिळवित तिसरे स्थान पटकावले. सोळा वर्षीय सौरभ चौधरीचा हा पहिला विश्वचषक असून यामध्ये त्याने विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावित ऑलिंपिक कोट्याचे लक्ष्यही गाठले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)