सौदीत अल्पवयीन मुलास 12 वर्षांचा कारावास

बैरुत: सौदी अरेबिया सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्या तसेच दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या एका मुलाला 12 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मूर्तझा कुएरिस असे या मुलाचे नाव आहे. तो शियापंथीय असून आता अठरा वर्षांचा आहे. मूर्तझा 10 वर्षांचा असताना सरकारविरोधी निदर्शनांत सहभागी झाला होता. हाती शस्त्र घेऊन दहशतवादी बनला होता असे त्याच्यावर आरोप आहेत. मूर्तझाला वयाच्या तेराव्या वर्षी अटक करण्यात आली. तेव्हापासून तो तुरुंगातच आहे. सौदी राजघराण्याच्या विरोधकांना तसेच शियापंथीय आरोपींना तेथील न्यायालये अत्यंत कडक शिक्षा सुनावतात. मात्र एखाद्या अल्पवयीन मुलाला कठोर शिक्षा सुनावण्याचा सौदीतील हा विरळ प्रसंग आहे.

त्याला न्यायालय देहांताची शिक्षा देण्याच्या विचारात आहे याची कुणकुण मानवी हक्क गटांना लागली होती. मूर्तझाच्या प्रकरणाचा गेली अनेक वर्षे युरोपियन सौदी ऑर्गनायझेशन फॉर ह्युमन राइट्‌स या संघटनेकडून पाठपुरावा करण्यात येत होता. या संघटनेचे संचालक अली अदूबिसी यांनी सांगितले की, मूर्तझाला चांगल्या वागणुकीच्या अटीवर (प्रोबेशन) चार वर्षे ठेवण्यात येईल. त्याची आधीच चार वर्षांची शिक्षा भोगून झालेली आहे. आणखी तीन वर्ष शिक्षा भोगल्यानंतर 2022 मध्ये त्याची मुक्तता होईल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×