रियाधवरील क्षेपणास्त्र हल्ला परतवल्याचा सौदीचा दावा

रियाध  – येमेनच्या हौती बंडखोरांनी केलेला क्षेपणास्त्र हल्ला परतवून लावण्यात आल्याची माहिती सौदीच्या सरकारी टेलिव्हिजनने दिली आहे. इराणचे समर्थन असलेल्या येमेनमधील बंडखोरांनी सौदीच्या राजधानीवर क्षेपणास्त्र हल्ले पुन्हा सुरू केले आहेत. त्यांनी सौदीच्या ताब्यातील उत्तरेकडील मरीब ताब्यात घेण्यासाठी ही क्षेपणास्त्रे डागली होती. मात्र सौदीने हा क्षेपणास्त्र हल्ला परतवून लावल्याचा दावा सौदीने केला आहे. मात्र हौती बंडखोरांनी किती क्षेपणास्त्रे सोडली होई, याचा तपशील सौदीने दिलेला नाही.

सौदीच्या राजधानीच्या परिसरात अनेक स्फोट ऐकू आले अशी माहिती वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी आणि रियाधमधील नागरिकांनी दिली. सरकारी वृत्तवाहिनीने दाखवलेल्या व्हिडीओमध्ये आकाशात क्षेपणास्त्रांच्या स्फोटांमुळे आगीचे लोळ उठतानाही दिसले होते. रियाधच्या दक्षिणेकडील भागात सोडण्यात आलेली चार ड्रोन देखील पकडण्यात आली आहेत.

कोणत्याही हल्ल्याची जबाबदारी बंडखोरांनी ताबडतोब स्वीकारली नाही. ते वारंवार सौदीच्या दक्षिणेकडील प्रदेशांवर हल्ले करतात. यापूर्वीही त्यांनी रियाधवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ले केले होते. सौदीच्या राजवाड्यावरही अलिकडेच चार ड्रोनचा हल्ला झाला होता. हे हल्ले इराकमधून झाले होते, असे इराणने म्हटले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.