इस्लामाबाद – सौदी अरेबियाने पाकिस्तानला 4.2 अब्ज डॉलरची मदत देण्याचे मान्य केले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला आर्थिक मदत म्हणून सौदीने पाकिस्तानला ही मदत देण्याचे मान्य केले आहे.
पाकिस्तानचे पंत्रधान इम्रान खान यांनी सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्याशी गेल्या आठवड्यात रियाधमध्ये केलेल्या चर्चेनंतर सौदीने याबाबतची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या सेंट्रल बॅंकेतील ठेवींच्या स्वरूपात 3 अब्ज डॉलरची मदत केली आहे. याशिवाय पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या शुद्धिकरणासाठी 1.2 अब्ज डॉलरचे अर्थसहाय्यही केले आहे, असेही चौधरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पाकिस्ताचे अर्थकारण संकटात सापडले असताना सौदीने केलेल्या मदतीबद्दल इम्रान खान यांनी सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांना धन्यवाद दिले आहेत.