ड्रोन हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने निम्म तेल उत्पादन थांबवले

तेलटंचाईच्या धोक्‍याबरोबरच तेलाच्या किंमती वाढण्याची शक्‍यता

सौदी : इराणच्या हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या सर्वात मोठी आरमको तेल कंपनीच्या दोन तेल क्षेत्रांना ड्रोनच्या साहाय्याने निशाणा करण्यात आला. बंडखोरांनी अबाकिक आणि खुराइस येथील तेल क्षेत्रांवर हवाई हल्ले केल्यानंतर सौदी अरेबियाने 50 टक्के अर्थात निम्म तेल उत्पादन थांबण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबिया हा जगभरात तेल निर्यात करणारा मोठा देश आहे. त्यामुळे या निर्णयाने तेलटंचाईच्या धोक्‍याबरोबरच तेलाच्या किंमती वाढण्याची शक्‍यता आहे.

जगातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण प्रकल्प असलेल्या आरमको कंपनीच्या दोन क्षेत्र बॉम्ब वर्षावाने हादरली. सौदी अरेबियाने येमेनमधील हुथी नियंत्रिथ क्षेत्रात हल्ले केल्याच्या रागातून हे हल्ले करण्यात आल्याची माहिती आता पुढे येत आहे. दरम्यान, आरमकोच्या दोन तेल क्षेत्रांवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने निम्म तेल उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी सरकारच्या या निर्णयामुळे दिवसाला 5.7 मिलियन बॅरल (एक बॅरल म्हणजे 159 लिटर) म्हणजेच जगाच्या एकूण तेल उत्पादनापैकी 5 टक्के उत्पादन कमी होणार आहे, असे सौदीच्या आरमकोने म्हटले आहे. अमेरिकेच्या ऊर्जा माहिती केंद्राच्या माहितीनुसार ऑगस्टमध्ये सौदी अरेबियाचे तेल उत्पादनाचे प्रमाण दिवसाला 9.85 मिलियन बॅरल तेल उत्पादन होते. दरम्यान, आरमकोच्या दोन क्षेत्रांवर झालेल्या हवाई हल्ल्याचा परिणाम गॅस उत्पादनावरही झाल्याचे सौदीने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.