रियाध – सौदी अरेबियाने कट्टर इस्लामी संघटना तबलिगी जमातवर बंदी घातली आहे. ही संघटना म्हणजे दहशतवादाचे एक प्रवेशद्वार असल्याचे सौदीने म्हटले आहे. देशातील सर्व मशिदींमधून येत्या शुक्रवारी सर्वांना या संघटनेविरोधात इशारा देण्याचा निर्णय सौदी सरकारने घेतला आहे.
सौदी अरेबियाच्या इस्लामिक व्यवहार मंत्रालयाने ट्विटरवर या संदर्भात एक पोस्ट केली आहे. “देशातील सर्व मशिदीतील धर्मगुरूंनी शुक्रवारच्या प्रार्थनेच्यावेळी तबलिगी जमात आणि दवाह गटाविरोधात सर्वांना इशारा द्यावा, अशी सूचना इस्लामी व्यवहारांचे मंत्री डॉ. अब्दुललतिफ अल अलशेख यांनी दिली आहे.
तबलिगी जमात आणि दवाह गटाबरोबरच्या भागीदारीवरही सौदी अरेबियाने बंदी घातली आहे. या गटांमध्ये सहभागी होणे धोकादायक आहे, हे लोकांना सागितले पाहिजे, असेही या संदेशात म्हटले आहे.
‘