नवी दिल्ली – दिल्लीचे आरोग्य मंत्री आणि आपचे नेते सत्येंद्र जैन यांना करोनाचा संसर्ग झाला. बुधवारी घेण्यात आलेल्या चाचणीत जैन यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आहे. त्यांच्या अनुपस्थितीत आरोग्य मंत्र्यांचा पदभार आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे देण्यात आला आहे.
जैन यांना ताप आल्याने मंगळवारी सकाळी दिल्लीतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर लगेचच त्यांची करोनाविषयक चाचणी घेण्यात आली. त्या चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. मात्र, ताप न उतरल्याने जैन यांची 24 तासांनी पुन्हा करोनाविषयक चाचणी घेण्यात आली. दुसऱ्या चाचणीत त्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. आता जैन यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्यांना ऑक्सिजन पुरवण्यात आला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
दरम्यान, दिल्लीतील आपच्या आमदार आतिषी यांनाही करोनाची बाधा झाली आहे.