ओझर : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जुन्नर विधानसभा मतदार संघामधून सत्यशिल शेरकर हे मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत तालुक्याचे जेष्ठ नेते शरद लेंडे यांनी ही माहिती दिली. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांच्यासह अनंतराव चौगुले, अंकुश आमले, मोहित ढमाले, तुषार थोरात, अशोक घोलप, बाजीराव ढोले, रौफ खान, सैद पटेल, जालंदर पानसरे, जितेंद्र बिडवई, आदिनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.
मंगळवारी (दि.29) सकाळी 10 वाजता जुन्नरच्या जुन्या स्टँडपासून शेरकरांच्या पदयात्रेला सुरवात होईल. त्यानंतर अर्ज दाखल करुन मार्केट यार्ड, जुन्नर येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती लेंडे यांनी दिली.
महाविकास आघाडी एकसंध
सत्यशिल शेरकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर महाविकास आघाडी ही एकसंध आहे. जे काही गैरसमज असतील ते चर्चेमधुन दूर झाल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.