मुंबई – अभिनेता जॉन अब्राहमचा मागील वर्षी 15 ऑगस्टला ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. याच चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.
Presenting the first look posters… John Abraham and Divya Khosla Kumar in #SatyamevaJayate2… Directed by Milap Milan Zaveri… Produced by Bhushan Kumar, Krishan Kumar, Monisha Advani, Madhu Bhojwani and Nikkhil Advani… 2 Oct 2020 release. pic.twitter.com/tpp0ZiovzD
— taran adarsh (@taran_adarsh) October 1, 2019
मिलाप मिलन झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात जॉनची मुख्य भूमिका आहे, तर अभिनेत्री दिव्या कुमार खोसला त्याच्यासोबत या चित्रपटात झळकणार आहे.
दरम्यान, तन, मन, धन से बढकर जन गन मन’, अशी टॅगलाईन असलेल्या या पोस्टरमध्ये दिव्या खोसला आणि जॉनचा दमदार लूक पाहायला मिळतो. फर्स्ट लूकसोबतच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी २ ऑक्टोंबरला हा चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे