गुप्त मतदान नको लाईव्ह टेलिकास्ट करण्याचेही आदेश
नवी दिल्ली : आज झालेल्या सुनावणीनुसार सर्वोच्च न्यायालयाने उद्याच देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वच आमदारांचा शपथविधी करून लगेच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
सत्य मेव जयते…
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 26, 2019
दरम्यान, या सुनावणीवर संजय राऊत यांनी ट्विट केले आहे की,’सत्य अस्वस्थ होऊ शकते .. मात्र पराभूत होऊ शकत नाही … सत्यमेव जयते.. असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
सत्य परेशान हो सकता है..
पराजित नही हो सकता…
जय हिंद!!— Sanjay Raut (@rautsanjay61) November 26, 2019