‘सत्यमेव जयते 2 ची रिलीज आऊट 

मुंबई – बॉलिवूडचा ऍक्शन हिरो म्हणजेच अभिनेता ‘जॉन अब्राहम’चा 15 ऑगस्ट 2018 रोजी ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. याच चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मिलाप मिलन झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

काही दिवसांपूर्वी  ‘सत्यमेव जयते 2′ चित्रपटातील लीड हिरो जॉन अब्राहमचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाच्या पोस्टर्सवर जॉनचा दमदार अवतार दिसून येत असून, “जिस देश की मैया गंगा है.., वहा खून भी तिरंगा है’ अशी टॅग लाईन सुद्धा देण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

यातच आता अभिनेता जॉन  याने इंस्टाग्रामवर  चित्रपटाची डेट रिलीज केली आहे. ‘सत्यमेव जयते 2’ 14 मे 2021 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.दरम्यान,  या चित्रपटाचा सिक्‍वल ऑक्‍टोंबर 2020 मध्ये प्रदर्शित करण्यात येणार होता. पण आता ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपट 14  मे 2021 रोजी ईद च्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

2018 मध्ये रिलीज झालेल्या सत्यमेव जयतेचे बजेट फक्त 45 कोटी रुपये होते. तर चित्रपटाची कमाई 88 कोटी रुपये होती. ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटासाठी जॉन अब्राहमने खास ट्रेनिंग घेतल्याचे कळते. या चित्रपटात जॉनसोबत अभिनेता मनोज बाजपेयी, दिव्या खोसला कुमार, अनूप सोनी, हर्ष छाया हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.