विघ्नहर सहकारी साखर कारखान्यावर सत्यशील शेरकर यांची निर्विवाद सत्ता

ओझर: श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक सन २०२५-२०३० या कालावधीसाठी संचालक पदाच्या ४ जागासाठी शनिवार दि १५ रोजी पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल रविवार दि.१६ रोजी घोषित करण्यात आला. यामध्ये शिरोली बुद्रुक गट क्रमांक २ मतदार संघातून सत्यशील शेरकर यांच्या शिवनेर पॅनलमधून ते स्वतः व अन्य २ असे तीनही उमेदवार तर इतर मागासवर्गीय मतदार संघातून १ असे एकूण चारही उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.
शिरोली बुद्रुक गट क्रमांक २ मधून ३ जागांसाठी ४ उमेदवार उभे होते यामध्ये विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे सत्यशील शेरकर यांच्या शिवनेर पॅनलमधून ते स्वतः,संतोष खैरे, सुधीर खोकराळे हे उमेदवार होते, तर त्यांच्या विरोधात रहेमान अब्बास मोमीन इनामदार हे उमेदवार होते. या निवडणुकीत एकूण ३१८५१ मतदान होऊन यापैकी ९९७ मते अवैद्य ठरली.
३०८५४ या मतांपैकी उमेदवारांना झालेले मतदान पुढीलप्रमाणे
इनामदार रहेमान अब्बास मोमीन -३४९
खैरे संतोष बबन-१००२५
खोकराळे सुधीर महादू -१००५७
शेरकर सत्यशील सोपानशेठ -१०४२३
यामध्ये इनामदार रहमान अब्बास हे पराभूत होऊन इतर तीन उमेदवार विजयी झाले. तर इतर मागासवर्गीय मतदार संघातून एका जागेसाठी ३ उमेदवार उभे होते. यामध्ये एकूण १०६१७ असे एकूण मतदान होऊन यापैकी ३६० मतं अवैध ठरली.
१०२५७ या मतांपैकी उमेदवारांना पडलेली मते पुढीलप्रमाणे
इनामदार रहमान अब्बास मोमीन-११६
गडगे सुरेश भिमाजी -९९२०
भुजबळ निलेश नामदेव -२२१
यामध्ये इनामदार रहमान अब्बास मोमीन व भुजबळ निलेश नामदेव हे पराभूत होऊन गडगे सुरेश भिमाजी हे विजय झाले आहेत. दरम्यान,या पूर्वी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक सन २०२५-२०३० निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी नंतर संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांपैकी पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या होत्या. ४ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीच्या निकालानंतर २१ जागांवर निर्विवादपणे सत्यशील शेरकर यांची सत्ता प्रस्थापित झाली आहे.





