सात्विक-चिरागचे आव्हान संपुष्टात

थायलंड ओपन सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत

बॅंकॉक -टोयोटा ऑलिम्पिक पदक विजेता सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्‌टी या जोडीचे थायलंड ओपन सिरीज बॅडमिंट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. या जोडीचा उपांत्य फेरीत मलेशियाच्या ऍरोन चिया आणि सो वू यिक या जोडीने पराभव केला. 

सात्विक आणि चिराग यांचे उपांत्य फेरीतील कामगिरी खूपच निराशाजनक ठरली. हा सामना त्यांनी 35 मिनिटांत गमविला. एकतर्फी ठरलेला हा सामना ऍरोन चिया आणि सो वू यिक यांनी 18-21, 18-21 असा सरळ दोन सेटमध्ये जिंकला. सात्विक आणि चिराग यांनी आक्रमक खेळी करत पहिल्या सेटमध्ये 4-2 अशी आघाडी घेतली होती. परंतु मलेशियन जोडीने कडवी झुंज ब्रेकपूर्वी 11-10 अशी आघाडी घेतली.

यानंतर भारतीय जोडीने 15-16 अशी अटीतटीचा संघर्ष केला. परंतु निर्णायक वेळी त्यांना कामगिरी उंचाविता न आल्याने त्यांनी 18-21 असा पहिला सेट गमविला.दुसऱ्या सेटमध्ये 3-1 अशा पिछाडीवर असलेल्या मलेशियन जोडीने सलग चार गुण मिळवित 7-3 अशी आघाडी घेतली. यानंतर सात्विक आणि चिराग यांना कोणतीही संधी न देता या सेटसह सामना जिंकत ऍरोन चिया आणि सो वू यिक यांनी आगेकूच केली.

दरम्यान, मिश्र दुहेरीतही सात्विक रांकीरेड्‌डी आणि अश्‍विनी पोनाप्पा या भारतीय जोडीला पराभव स्वीकारावा लागला. तैवानच्या डेचापोल पुआवारनुक्रोह आणि सॅपसिरी तयरांजेचाईने हा सामना 22-20, 18-21, 21-12 गुणांसह जिंकला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.