प्रभासच्या मागे लागला शनी

बाहुबली फेम अभिनेता प्रभास याचा आगामी “आदिपुरुष’च्या शूटिंग दरम्यान सेटवर आग लागल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. ही घटना ताजी असतानाच प्रभासच्या आणखीन एका चित्रपटाच्या टिमसोबत मोठी दुर्घटना घडली आहे. “सालार’ चित्रपटाच्या टिमचा अपघात झाला असून टिममधील सदस्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या टिममध्ये नेमके कोण होते त्यांची नावे अद्याप पुढे आली नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)


ही टीम शूटिंग संपवून हॉटेलवर परत येत होती. त्याचवेळी व्हॅनचा अपघात झाला आहे. या अपघातात काही जण जखमी झाले आहेत त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तेलंगण गोदावरीखानी येथे हा अपघात झाला. सैफ अली खान आणि प्रभासचा चित्रपट आदिपुरुषची घोषणा झाल्यापासून चित्रपट चर्चेत आला आहे. ओम राऊतच्या या चित्रपटात प्रभास राम आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहेत. बऱ्याच वादांनंतर चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

मात्र, शूटिंग दरम्यानच सेटवर आग लागली होती. दिग्दर्शक ओम राऊत आणि त्यांची संपूर्ण टीम सुरक्षित आहेत. ज्यावेळी आग लागली होती त्यावेळी सेटवर प्रभास आणि सैफ शूटवर नव्हते. आग लागल्यानंतर काही मिनिटांतचअग्निशमन दलाने येऊन संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने ट्‌वीटद्वारे मोशन कॅप्चर सुरू झाल्याची माहिती दिली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.