“शनिवारवाडा भाड्याने देणे आहे’

पुणे  – राज्यातील काही गड-किल्ले हॉटेल तसेच पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने “शनिवारवाडा भाड्याने देणे आहे’ असे फलक लावत शनिवारवाड्याच्या पटांगणावर आंदोलन केले.

यावेळी भाजपच्या या निर्णयाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, माजी महापौर प्रशांत जगताप, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, नगरसेवक वनराज आंदेकर, काकासाहेब चव्हाण, राकेश कामठे, महिला अध्यक्ष स्वाती पोकळे, युवक अध्यक्ष महेश हांडे, सामाजिक न्याय अध्यक्ष बापू डाकले, श्रीकांत पाटील, प्रदीप देशमुख, गणेश नलावडे, राजेंद्र खांदवे, मनोज पाचपुते, फहीम शेख यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

शासन वर्ग-2 चे किल्ला भाड्याने देणार, असे म्हणत आहे. पण, शनिवारवाडा हा तर किल्ला पण नाही. त्यामुळे आपण शनिवारवाडा भाड्याने द्यावा. यासाठीचे एजंट शुल्क व पार्किंग शुल्क भाजप नेत्यांनी घ्यावे, अशी टीका शहराध्यक्ष तुपे यांनी यावेळी केली. तसेच भाजप सरकारने हा तुघलकी निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा, अन्यथा त्यांना जनता त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.