मुंबई – बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक ‘सतीश कौशिक’ आता मराठी चित्रपटसृष्टीत निर्माते म्हणून पदार्पण करत आहेत. “मन उधाण वारा” या आपल्या आगामी चित्रपटातून सतीश कौशिक अतिशय हळवी आणि सुंदर प्रेमकथा सिनेरसिकांसाठी घेऊन येत आहे. ही प्रेमकथा असली तरी आयुष्याचे विविध रंग यातून अनुभवायला मिळणार आहेत. यापूर्वी देखील सतीश कौशिक यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयातून आपले वेगळे पण सिद्ध केले आहे.
“मन उधाण वारा”या चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत. येत्या 11ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.