मृत्यूदर दोन महिन्यांपासून “जैसे थे’ ः बाधित दर 1.5 टक्के
पुणे – ग्रामीण भागातील करोनाबाधित दरात मागील दोन महिन्यांत लक्षणीय घट झाली आहे. मात्र, मृत्यूदरामध्ये घट न झाल्यामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढलेली आहे. तीन महिन्यांपासून ग्रामीणमधील बाधित दर 1.5 टक्के इतका आहे. ऑगस्ट महिन्यातही हा दर “जैसे थे’ आहे.
ग्रामीणमध्ये करोनाच्या पहिल्या लाटेत जून 2020 महिन्यात मृत्यूदर सर्वाधिक 4.3 टक्के इतका होता. त्यानंतर हा मृत्यूदर 2.1 ते 2.5 टक्क्यांच्या आसपास होता. फेब्रुवारीमध्ये करोनाची दुसरी लाट सुरू झाली.
त्यावेळी बाधित संख्येबरोबर मृत्यूची संख्या झपाट्याने वाढू लागली. 23 एप्रिल 2021 मध्ये 1.5 टक्के मृत्यूदर होता. मे महिन्यात मृत्यूदर 1.4 टक्के नोंदविण्यात आला. मात्र, त्यानंतर हा दर “जैसे थे’ असून, आजही मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.