सातारा – जिल्ह्यात काल बुधवारी रात्री बारा वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1017 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर 20 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
तसेच जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून आणि विविध करोना केअर सेंटरमधून गुरूवारी सायंकाळपर्यंत 1009 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
आजच्या या करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि आजअखेर बाधित रुग्णांची एकूण संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे. जावळी 31 (8971), कराड 247 (31653), खंडाळा 94 (12382), खटाव 74 (20588), कोरेगाव 90 (17958), माण 64 (13793),
महाबळेश्वर 10 (4407), पाटण 59 (9221), फलटण 105 (29388), सातारा 195 (42805), वाई 38 (13420) व इतर 10 (1505), जिल्ह्यात आजअखेर करोनाबाधितांची एकूण संख्या दोन लाख सहा हजार 91 इतकी झाली आहे.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची तालुकानिहाय संख्या आणि आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे.
जावळी 1 (186), कराड 13 (947), खंडाळा 0 (156), खटाव 0 (491), कोरेगाव 1 (387), माण 0 (288), महाबळेश्वर 0 (85), पाटण 2 (312), फलटण 1 (487), सातारा 1 (1267), वाई 1 (309) व इतर 0 (71). आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4986 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.