Satara ZP Election 2026 – वाई तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ना. मकरंद पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या ओझर्डे जिल्हा परिषद गटात प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. ओझर्डे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वृषाली चव्हाण विरुद्ध भाजपकडून अल्पना यादव अशी तुल्यबळ होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत उमेदवार निवडून आणायचाच असा पण दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे ओझर्डे गटात ‘लाडक्या बहिणीं मध्ये’ ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे.गत जिल्हा परिषद निवडणुकीत हा गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या ओझर्डे गटातील ज्येष्ठ नेते स्व. अरविंद चव्हाण यांच्या स्नुषा व स्व.ॲड. ललित चव्हाण यांच्या पत्नी वृषाली चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभ्या आहेत. तर त्यांच्याविरुद्ध युवा नेते प्रताप यादव यांच्या पत्नी सौ. अल्पना यादव या भाजपकडून रणांगणात उतरल्या आहेत. या दोघीही उच्चशिक्षित आहेत. राष्ट्रवादी गटाच्या उमेदवार वृषालीताई चव्हाण या नवख्या आहेत. तर भाजप पुरस्कृत उमेदवार अल्पना यादव यांनी या अगोदर ओझर्डे जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.ना. मकरंद पाटील हे आमदार होण्याआधी त्यांनी या गटाचे प्रतिनिधित्व केले होते. मकरंद पाटील त्यांच्याविरुद्ध प्रताप यादव हे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. यादव यांना पराभवाचा सामना करावा लागला. प्रताप यादव यांनी चार वेळा ओझर्डे जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढवली पण त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ.अल्पना यादव या भाजपमधून उमेदवार म्हणून उभ्या आहेत. त्यांना निवडणुकीचा अनुभव आहे. वृषालीताई चव्हाण या नवख्या उमेदवार त्यांच्यासमोर उभ्या आहेत. त्यामुळे यावेळी कोण कोणास भारी पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ना. मकरंद पाटलांचा बालेकिल्ला ओझर्डे जिल्हा परिषद गट हा ना. मकरंद पाटलांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या गटात कोणताही उमेदवार उद्या तो उमेदवार डोळे झाकून निवडून येतो अशी या गटाची ओळख आहे. त्यामुळे या गटात गत पंचवीस वर्षापासून मकरंद पाटलांचा उमेदवार निवडून येत आहे. प्रताप यादव यांची पुन्हा लढाई युवा नेते प्रताप यादव हे स्वच्छ प्रतिमा, उच्चशिक्षित, सुस्वभावी अशी त्यांची ओळख आहे. तरी सुद्धा गत चार जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान त्यांनी खचून न जाता पराभव स्वीकारत पुन्हा जोमाने ताकतीने ओझर्डे गटासाठी विकासासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.