सातारा (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांचा अहवाल बुधवारी करोनाबाधित आला आहे. विधाते बाधित आल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले प्रारंभी करोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर विविध विभागांतील पाच ते सहा कर्मचारी करोनाबाधित आढळून आले होते.
शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेस उपस्थित असलेले एक सदस्य त्याच दिवशी रात्री करोनाबाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर जिल्हा परिषद हादरून गेली होती. विशेष म्हणजे प्रकृती अस्वस्थामुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते या सभेस उपस्थित न्हवते. मंगळवारी विधाते यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली होती. ही टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र, विधाते यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. याचा रिपोर्ट बुधवारी आला आहे. रिपोर्ट बाधित आल्यानंतर विधाते यांना कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.