सातारा : चिंताजनक! जिल्ह्याचा मृत्युदर 3.31 टक्‍के

"रिकव्हरी रेट' 94 टक्‍क्‍यांच्या आसपास

सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात रविवारी (दि. 21) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार 70 नागरिक करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सोमवारी दिली. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण थोडे वाढून 9.2 टक्‍के झाले आहे. बाधितांचे बरे होण्याचे प्रमाण 94 टक्‍क्‍यांच्या आसपास कायम असून करोनाबळीही थोडे घटले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 54 हजार 158 झाली आहे, तर उपचारांखालील रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत आहे.

सातारा तालुक्‍यामध्ये सातारा शहरात शुक्रवार पेठ चार, गुरुवार पेठ दोन, व्यंकटपुरा पेठ, शनिवार पेठ, मल्हारपेठ, केसरकर पेठ, सदरबाझार प्रत्येकी एक, इतरत्र पाच, शाहूपुरी, गेंडामाळ, गुलमोहर कॉलनी, विकासनगर, तामजाईनगर, धनगरवाडी प्रत्येकी एक,

कराड तालुक्‍यातील कराड शहर एक, फलटण तालुक्‍यामध्ये फलटण शहरात शुक्रवार पेठ दोन, दत्तनगर, पद्मावतीनगर प्रत्येकी एक, इतरत्र पाच, शेंडे वस्ती, निरगुडी प्रत्येकी एक, खटाव तालुक्‍यात मायणी चार, पुसेसावळी तीन, सिद्धेश्वर कुरोली दोन, खटाव, निमसोड, कातळगेवाडी प्रत्येकी एक, माण तालुक्‍यातील गोंदवले, मलवडी प्रत्येकी एक,

कोरेगाव तालुक्‍यात कोरेगाव दोन, रहिमतपूर एक, वाई तालुक्‍यात वाई शहर तीन, जांब एक, खंडाळा तालुक्‍यात शिरवळ आठ, इतर सात, बाहेरील जिल्ह्यातील सोलापूर एक, असे 70 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात दोन बाधितांचा मृत्यू 

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांमध्ये दोन बाधितांचा मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांमध्ये करोनाबळींची संख्या कमी-अधिक होत असून ते पूर्णपणे रोखण्यात अपयश येत आहे. संपूर्ण देशात करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण दीड टक्‍क्‍यांच्या आत आले असताना, त्या तुलनेत सातारा जिल्ह्याचा मृत्युदर 3.31 टक्‍के इतके चिंताजनक आहे.

जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये पाचवड, ता. वाई येथील 62 वर्षीय महिला व म्हसवड, ता. माण येथील 65, अशा एकूण दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात करोनाबळींची एकूण संख्या 1793 झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.