Satara Weather – हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवसांमध्ये विजेच्या गडगडाटसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल जाणवत असून अनेक ठिकाणी वादळी वार्यासह पावसाने जिवित व वित्त हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क झाला आहे. नागरिकांनीही हवामानाच्या बदलाबाबतच्या सुचनांनुसार कार्यवाही करावी. विजांचा गडगडाट होत असताना नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. तसेच जनावरांनाही झाडाखाली आश्रय देऊ नये.इलेक्ट्रिक पोल पासून शक्यतो दूर रहावे.पाण्यात असाल तर तात्काळ पाण्याच्या बाहेर पडावे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करुन प्लग बाहेर काढून ठेवावेत. वादळी वारे वाहत असताना शक्यतो मोबाईलचा वापर टाळावा. अशा परिस्थितीत नागरिकांनी शक्यतो सुरक्षित ठिकाणी घरातच थांबावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे. अॅपवरुन मिळणार वीज कोसळण्याची पूर्वसुचना वीज, गडगडाट व मुसळधार पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे. प्रतिकूल हवामानात आपले व कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन उ-झ ड-उकएढ अॅप, दामिनी (ऊराळपळ) ङळसहींपळपस -श्रशीीं अॅप डाऊनलोड करावे. याअॅपच्या माध्यमातून हवामान अपडेट्स व शासकीय सूचना, वीज कोसळण्याची पूर्वसूचना – 30-40 मिनिटे आधी अलर्ट, मुसळधार पाऊस, गडगडाटी वादळ, चक्रीवादळ यांचे अलर्ट तसेच जीपीएस आधारित तुमच्या परिसरातील अचूक माहिती मिळणार आहे.