वाठार स्टेशन – वाठार स्टेशन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शुक्रवार, दि. 15 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे त्या दिवशीचा आठवडा बाजार रद्द करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामसेवकाने दिली.
वाठार स्टेशन ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानादिवशी येथील आठवडा आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार हा बाजार रद्द करण्यात आला आहे. या आठवडा बाजारात येणारे शेतकरी, व्यापारी व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.