सातारा | जिल्ह्यात 18 हजार नागरिकांचे लसीकरण

सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात 145 केंद्रांवर 17 हजार 941 नागरिकांचे गुरुवारी लसीकरण करण्यात आले. काही केंद्रांवर अल्प प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध असले तरी शुक्रवारी लसीकरणात व्यत्यय येणार आहे.

जावळी तालुक्‍यातील 9 केंद्रांवर 659, कराड 27 केंद्रांवर दोन हजार 858, खंडाळा 10 केंद्रांवर एक हजार 107, खटाव 16 केंद्रांवर दोन हजार 648, कोरेगाव 16 केंद्रांवर दोन हजार 76, महाबळेश्वर 4 केंद्रांवर 362, माण 7 केंद्रांवर 1008, पाटण 6 केंद्रांवर तीन हजार 648, फलटण 14 केंद्रांवर एक हजार 984, सातारा 24 केंद्रांवर तीन हजार 670, वाई तालुक्‍यातील 12 केंद्रांवर एक हजार 101 असे 145 केंद्रांवर 17 हजार 941 लसीकरण करण्यात आले. 

जिल्ह्यात आतापर्यंत 45 वर्षांवरील पाच लाख 97 हजार 320 नागरिकांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती डॉ. प्रमोद शिर्के यांनी दिली. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यात 26 हजार कोविशिल्ड लसीचे डोस उपलब्ध झाले होते. 

गुरुवारी सुमारे 18 हजार लसीकरण झाले असल्याने जिल्ह्यातील बहुतांशी केंद्रांवर शुक्रवारी लसीचा तुटवडा जाणवणार आहे. कोव्हॅक्‍सिन लसीचे डोस मिळत नसल्याने अनेक नागरिक दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. याबाबत प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.