गोंदवले: रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दहिवडीजवळ झालेल्या स्विफ्ट कार व ट्रकच्या भीषण अपघातात दहिवडीतील दोघे जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला.
याबाबतची माहिती अशी, दहिवडीतील पियुष शैलेंद्र खरात (वय 22), स्वयंम सुशिल खरात (16) व अक्षय दीपक खरात हे तिघेजण रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारमधून फलटण बाजूकडून दहिवडीला येत होते, तर त्याचवेळी एक ट्रक दहिवडी बाजूकडून फलटणच्या दिशेने चालला होता.
फलटण रस्त्यावरील हिंदुस्थान पेट्रोलियम पंपासमोरील वळणावर या दोन्ही गाड्यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात पियुष व स्वयंम हे जागीच ठार झाले, तर अक्षय गंभीर जखमी झाला आहे.